👁 6 Views

महिलेचे हात – पाय कापून हत्या ; रक्तबंबाळ अवस्थेत तिने मुलाला सांगीतले आरोपींची नावे

 

दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड सारखीच एक घटना बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून समोर आली आहे.


भररस्त्यात नीलम नावाच्या महिलेची शरीराचे अवयव कापून हत्या करण्यात आली. महिलेच्या गावातील शकील या व्यक्तीने त्याच्या भावासोबत मिळून महिलेचे हात, कान आणि स्तन कापले. आरोपी पायही कापणार होते, मात्र कोणीतरी आल्याने दोघेही पळून गेले. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा वाटेतच मृत्यू झाला. पोलिसांनी मुख्य आरोपी शकील आणि त्याचा भाऊ मोहम्मद जुद्दीनला अटक केली आहे.



महिलेचा मुलगा कुंदन याने सांगितले की, तो आईसोबत सायकलने पिरपेंटी मार्केटला गेला होता. घरी परतत असताना त्याने आईला सिंघिया पुलापासून काही अंतरावर सोडले. आई पायी घरी जात होती, तेव्हाच शकील आणि जुद्दीनने हा हल्ला केला. महिलेचा आरडाओरडा ऐकून तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने तिचा पती अशोक यादव याला फोन केला. पतीने मुलाला माहिती दिली. मुलगा आईजवळ पोहोचला तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. या अवस्थेतही शकीलने हातपाय कापल्याचे आईने मुलाला सांगितले.



आरोपींनी चिकन चॉपरने महिलेचे अवयव कापले होते. पोलिसांनी हत्येत वापरलेले हत्यार जप्त केले आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातून आणखी शस्त्रे जप्त केली आहेत. घटनास्थळावरून एकाची चप्पल व भांडे, तुटलेल्या बांगड्या आणि रक्ताने माखलेली मातीही सापडली आहे. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *