सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भक्ती असणे ठीक पण तिचा अतिरेक झाला की काय होते याचा प्रत्यय त्या व्हिडिओतून आल्याचे दिसून येत आहे.
भक्ती ही अनेकदा अंगलट कशी येतेय याचा प्रत्यय त्या व्हिडिओतून येत आहे. हत्तीच्या मुर्तीचे दर्शन घेण्याचा त्या भक्ताचा अट्टाहास त्याच्या जीवावर बेतल्याचे दिसून आले आहे.
हत्तीच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी तो त्या मुर्तीच्या पायाखाली घुसला खरा पण त्यातून त्याला बाहेर पडता येईना. त्यानं बऱ्याचवेळा प्रयत्नही केले पण काही केल्या त्याला बाहेर येता न आल्यानं उपस्थितांचीही चांगलीच दमछाक झाली. त्याला ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण यासगळ्यात त्याची अवस्था आणखीनच केविलवाणी झाली होती.



