ऑपरेशन परिवर्तन’च्या माध्यमातून जिल्ह्यातील तांड्यांवरील बंद झालेल्या दारूच्या हातभट्ट्या आता पुन्हा पेटत असल्याची स्थिती आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईतून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
एक लाख ३४ हजाराचा मद्यसाठा व दोन वाहने असा एकूण सहा लाख दोन हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल त्या पथकाने हस्तगत केला. दुसरा संशयित आरोपी सचिन बनसोडे हा पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. दुसरीकडे बक्षीहिप्परगा तांड्याजवळील सेवालाल तांड्यावर छापा टाकला.
नवनाथ खेमा राठोड याच्या घरातून ८ रबरी ट्यूबमध्ये ६४० लिटर हातभट्टी आणि द्वारकाबाई कोंडिबा राठोड हिच्या घरातील २२ रबरी ट्यूबमधून दोन हजार २०० लिटर हातभट्टी दारू जप्त केली. गणपत तांडा परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून विजय मानसिंग चव्हाण व संजय थावरु पवार याच्या ताब्यातून ३६ प्लास्टिक बॅरेलमधील गुळमिश्रित रसायन नष्ट केले. दोन हजार ८४८ लिटर हातभट्टी दारू व सात हजार २०० लिटर रसायन असा एकूण तीन लाख सात हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला.



