👁 10 Views

पहारेकऱ्याच्या पत्नीचं मालकासोबत अफेअर ; केला आत्महत्येचा बनाव

 

शेतावर पहारेकऱ्याचं काम करणाऱ्या व्यक्तीची पत्नीने प्रियकरासोबत मिळून हत्या केल्याची घटना घडली आहे. पतीने आत्महत्या केली, असं वाटावं म्हणून तिने एक कटदेखील रचला होता


अकोल्यातील ही घटना आहे. पोलिसांना दोन दिवसांपूर्वी विहीरीमध्ये बंडू ठाकूर याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणातील सत्य समोर आलेलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार बंडू यांच्या पत्नीने मीसिंगची केस दाखल केली होती.


पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला होता. या रिपोर्टमध्ये बंडू यांची गळा दाबून हत्या झाल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि तपासाची चक्रे फिरली


पोलिसांनी सांगितलं की, मृत बंडू हे शेतामध्ये पहारेकऱ्याचं काम करत होता. संशय आल्यानंतर बंडूची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं. प्रियकर शाम खुले याने खूनाची कबुली दिली. शामच्याच शेतामध्ये बंडू काम करायचा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *