👁 4 Views

हातात बांगड्या, कपाळावर टिकली , महीलांप्रमाणे सजून दहावीच्या विद्यार्थ्याने स्वतः चाच घेतला जीव

 

पश्चिम बंगाल राज्यातल्या सिलिगुडीमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कुटुंबीय घराबाहेर गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.


धक्कादायक म्हणजे, एखाद्या विवाहितेप्रमाणे त्याने साडी नेसली होती. त्याच्या हातात बांगड्या व चेहऱ्यावर मेकअपही दिसत होता. मुलगा फासावर लटकल्याचं पाहून शेजाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.


 त्यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आले तेव्हा समोरचं दृश्य पाहून तेही चक्रावले. ‘आज तक’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.


पश्चिम बंगालच्या सिलिगुडी शहरात दक्षिण शांतिनगर भागात हा धक्कादायक प्रकार घडला. याची माहिती सिलिगुडी मेट्रोपॉलिटन पोलिसांना शेजाऱ्यांनी दिली होती. आत्महत्या करणारा मुलगा दहावीत शिकत असून तो सध्या परीक्षेची तयारी करत होता. मुलाने आत्महत्या केली तेव्हा त्याचे कुटुंबीय घराबाहेर गेलेले होते. घडलेल्या प्रकाराची माहिती शेजाऱ्यांकडूनच त्यांना मिळाली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *