सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ आपण पाहत असतो. यामध्ये लग्नातील काहीवेळा नवरा-नवरीचे फनी व्हिडीओही व्हायरल होतात. अशाच प्रकारे आतापण एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये लग्न लावताना मंगलाष्टका बोलणाऱ्या भटजीबुवांचा पारा चढतो.
लग्नाच्यावेळी मंगलाष्टका चालू असताना तिथली काही मुलं गुरूजी म्हणजेच भटजीबुवांवर जोरात अक्षता फेकून मारतात. काही वेळ गुरूजी सहनही करतात मात्र एकवेळ अशी येते की, गुरूजी लग्न चालू असताना थांबतात आणि, मंगलाष्टका म्हणायच्या का बंद करायच्या सांगा, असा सवाल करतात.
गुरूजी रागाने लालबुंद होतात तर दुसरीकडे नवरदेव मात्र हसत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता हे सर्व घडतं, गुरूजी लग्नच थांबवू का असा धमकीवजा इशारात संबंधित मुलाला देतात. सोशल मीडियावर व्हिडीओ पाहून हसून हसून लोटपोट झाले आहेत. प्रत्येकाने मित्राच्या किंवा आपल्याच परिवारातील जवळच्याच्या लग्नात असा उद्योग केला आहे. त्यामुळे व्हिडीओ पाहिल्यावर हसू आल्याशिवाय राहिलं नाही.
दरम्यान, आताच दोन तीन दिवसांमागे इंग्रजीमध्ये मंगलाष्टका म्हणणाऱ्या भटजींचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लहानपणापासून मराठीमध्ये ऐकलेली मंगलाष्टका इंग्रजीमध्ये ऐकणं वऱ्हाडी मंडळींसाठीही वेगळा अनुभव होता.



