जम्मू काश्मीर येथे नुकत्याच झालेल्या संम्बो राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कास्यपथकास एकूण 7 पथकांची कमाई केली.
संम्बो खेळ कुस्ती व , जुडो यांचे मिश्रण आहे या स्पर्धेत सुरेश मार्कड ,दत्तात्रय शिंदे, मासुमा इराणी यांनी सुवर्णपदकाची कामाई केली व निलेश कांबळे मनीषा पाटोळे यांनी रौप्य पथकाची कमाई केली.
स्वप्निल येडगे व गणेश बोडरे यांनी कांस्यपदाची कमाई केली महाराष्ट्र स्पोर्ट्स संम्बो असोसिएशन महाराष्ट्राचे सचिव कुमार उगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या.
संम्बो असोसिएशन सोलापूरचे सचिव संतोष गलांडे यांनी ड्रॅगन मार्शल आर्ट क्लब अँड, स्पोर्ट्स अकॅडमी पंढरपूर अंतर्गत मुलांना मार्गदर्शन व कोच म्हणून काम केले.
भारतातून पुढील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कझाकिस्तान या देशामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधानदादा आवताडे यांनी मुलांचा सत्कार व कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




