👁 6 Views

मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल

 

चोरी करण्यासाठी चोर वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरतात, त्यातील भन्नाट कल्पनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. असाच मोबाईल चोरी करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.


पण या व्हिडीओतील चोराचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे, का ते जाणून घ्या.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका मोबाईलच्या दुकानात एक ग्राहक मोबाईल पाहत असल्याचे दिसत आहे, हा माणूस ग्राहक नसून चोर असल्याचे तेव्हा समजते जेव्हा तो फोन घेऊन दुकानाबाहेर पळण्याचा प्रयत्न करतो. 


पण यात तो अपयशी ठरतो कारण दुकानदाराने दरवाजे आधीच लॉक केलेले असतात. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, पाहा व्हिडीओ.


व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या चोराला नक्कीच जन्माची अद्दल घडली असेल. नेटकऱ्यांनीही यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये हुशार दुकानदाराचे कौतुक केले आहे, ज्याने चोराचे हावभाव पाहून आधीच दरवाजे लॉक केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *