👁 4 Views

पंढरपूर सिंहगडचे डाॅ. समीर कटेकर यांना “उत्कृष्ट नेता” पुरस्कार जाहीर

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले डाॅ. समीर कटेकर यांना “प्रशिक्षण आणि प्लेसमेंट २०२२” मध्ये उत्कृष्ट नेता” पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


  प्रतिष्ठित पुरस्कार महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कडून एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय पंढरपूर महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर यांना “प्रशिक्षण आणि प्लेसमेंट २०२२” मध्ये उत्कृष्ट नेता” पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार २२ डिसेंबर २०२२ रोजी सोलापुर येथील हाॅटेल बालाजी सरोवर येथे डाॅ. समीर कटेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.


     ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नामंकित आय. टी. कंपनीत विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊन उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित पुरस्कार महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कडून पुरस्कार जाहीर झाला आहे.


    डाॅ. समीर कटेकर यांना प्रशिक्षण आणि प्लेसमेंट २०२२ चा “उत्कृष्ट नेता” पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्याम कुलकर्णी, डाॅ. श्रीगणेश कदम, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. राजेंद्र पाटील, प्रा. सुभाष पिंगळे, डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. अनिल निकम, प्रा. अभिजित सवासे सह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *