👁 5 Views

हातपाय धडा वेगळे करुन वृद्धाला संपवलं

 

लातूरमध्ये  एक धक्कादायक घटाना समोर आलीय. शेतीला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या वृद्धाची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आलीय. बशीर मदार शेख असे हत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे.


लातूर जिल्ह्यातील बाभळगाव-बोरी रस्त्याच्या कडेला पाय, एक हात आणि शीर असे तुकडे आढळल्यानंतर ही घटना समोर आलीय. लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून असा प्रकारे निर्घृण खूनाची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


लातूर पासून जवळ असलेल्या बाभळगाव- बोरी रस्त्याच्या कडेला एका वृद्धाचे शीर, एक हात आणि पाय आढळून आले आहेत. मृत वृद्ध बाभळगाव येथील रहिवासी आहेत.


 बाभाळगावपासून दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला शेख यांच्या शेतातच शीर, एक हात आणि दोन पाय असे अवयव आढळून आले. त्यामुळे शेख यांची हत्या झाल्याचे समोर आले. परंतु, ही हत्या कोणी आणि का केली यायबाबत अद्याप माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *