👁 4 Views

आईच्या अफेअरमुळे रागावला होता मुलगा , मॉर्निग वॉक करत असलेल्या प्रियकरावर झाडली गोळी

 

अनैतिक संबंधातून घडणाऱ्या अनेक हैराण करणाऱ्या घटना नेहमीच समोर येत असतात. अनेकदा असंही बघायला मिळतं की, आई-वडील किंवा नातेवाईक आपल्या मुलांचं प्रेम मान्य करत नाही

पण यूपीच्या बरेलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बरेलीच्या सीबीगंजमध्ये आईच्या अफेअरमुळे नाराज असलेल्या मुलांनी तिच्या प्रियकराची सकाळी गोळी झाडून हत्या केली आणि ते फरार झाले. तेच बंदुकीच्या फायरिंगच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली.


 घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी जखमी तरूणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तर दुसरीकडे सूचना मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. या घटनेबाबत जखमी विकासने सांगितलं की, त्याचं त्याच्या परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत अफेअर सुरू आहे. याची माहिती तिच्या मुलांना मिळाली होती.


याचाच राग महिलेच्या मुलांच्या मनात होता. तरूणाने सांगितलं की, तो रोज सकाळी फिरायला जातो. तेव्हाच लपून बसलेल्या महिलेच्या मुलांनी त्याच्यावर फायरिंग केली. यात एक गोळी त्याच्या पोटात लागली. जखमी तरूणावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


जखमी तरूणाने पुढे सांगितलं की, महिलेसोबत मी बोलत होतो. ती माझ्यासोबत राहण्यासाठी आली होती. आम्ही दोघे 6 ते 7 महिने सोबत राहिलो. त्यामुळेच माझ्यावर हल्ला झाला. मी पोलिसांना त्यांची नावे सांगितली आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *