याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दुपारी पिंपरी येथे जाऊन किराणा आणण्यासाठी रहाटणी येथे चौकात रिक्षाची वाट पहात थांबल्या होत्या.
यावेळी एका इसमाने येवून फिर्यादी यांना सांगितले की, आमच्या शेठला 12 वर्षानंतर मुलगा झाला आहे.
त्यामुळे शेठ गरीब लोकांना फुकट कपडे वाटत आहेत.तुम्ही मराठी अहात का, गरीब आहात का म्हणत त्या इसमाने फिर्यादीला सोबत घेऊन क्राऊन बेकरीच्या समोर घेऊन जाऊन तिथे आणखी एक इसम बसला होता.
दोघांनी फिर्यादी यांच्या अंगावरील 50 हजार रुपयांच्या 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन माळा काढून घेतल्या व त्यांच्या कडील पिशवीतील 7 हजार रुपये रोखही हिसकावून घेतले. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.



