चौथी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण करून पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक कर्नाटकमधून घटना समोर आली आहे.
दुर्घटनेत विद्यार्थ्याचा जागीत मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या उत्तरेकडील आदर्श प्राथमिक शाळेतील ही धक्कादायक घटा उघडकीस आली आहे.
शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थ्याला आधी लोखंडीं रॉडने मारहाण केली आणि नंतर शाळेच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली ढकलून दिले.
या घटनेत चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हगली गावातील आदर्श प्राथमिक शाळेत ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भरत असे या मुलाचे नाव असून भरत हा इयत्ता चौथीचा विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याच्या आईलाही शिक्षकाने मारहाण केल्याचा आरोप आहे.



