👁 5 Views

दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

 

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मैत्रीचा बहाणा करून तिच्या शाळेच्या गेटपासून मोटार सायकलवर बसवून खुलताबाद येथील धाब्यावर घेवून जावून बलात्कार केला.



विशेष म्हणजे यापुर्वी देखील त्याने गेल्या दोन वर्षापासून तीन ते चार वेळा त्याच धाब्यावर घेवून जावून बलात्कार केला होता. ही घटना सोमवारी (ता.19) रोजी उघडकीस आली. यामुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर येथील पिडीत 17 वर्षीय विद्यार्थीनी सोमवारी (ता.19) रोजी सकाळी 7.30 वाजता शाळेत जाणेसाठी घरातून निघाली. ती शाळेच्या गेटजवळ पोहचली. तेव्हा अंदाजे 8 वाजता तिच्या परिचयाचा मित्र शिव चौधरी, रा. बजाजनगर हा त्याचे शाईन मोटार सायकलवर उभा होता. त्याने पीडित मुलीला बोलावून सांगीतले की, चल आज आपण माझ्या मोटार सायकलवर दोघे फीरून येवू. तेव्हा तिने त्यास माझी शाळा आहे, मी येत नाही.

तु मला फिरण्याचा बहाणा करून मागे सुध्दा माझ्यासोबत घाणेरडे प्रकार केले होते. मी येत नाही, असे म्हणाली. परंतु आरोपी शिव चौधरी याने तीला परत परत सांगून त्याचे शाईन मोटार सायकलवर बसविले. व खुलताबाद येथील एका धाब्यासारखे हॉटेलवर घेवून गेला. तेथे एका रूममधे तीला घेवून जावून त्याने तिच्यासोबत ईच्छेविरूध्द जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यास नको नको म्हणून विद्यार्थिनीने बराच विरोध केला.


परंतु त्याने तिचे काहीही ऐकले नाही. त्यानंतर आरोपीने मोटार सायकलवर बसवून परत बजाजनगर येथे शाळेच्या गेटजवळ दुपारी 1 वाजता सोडले. त्यानंतर पीडित विद्यार्थिनी घरी गेली, तेव्हा ती शाळेत गेली नसल्याचे घरच्यांना व नातेवाईकांना समजले होते. त्यामुळे त्यांनी तीला विश्वासात घेवून विचारपूस केली असता घडलेला प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी शिव चौधरी यांच्या विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *