👁 7 Views

वडीलांसमोर मुलीला कारमध्ये टाकून पळवलं, थेट लग्नाचे फोटो पाठवले

 

तेलंगाणाः एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये वडिलांसमोर तरुणीला कारमधल्या तरुणांनी जबरदस्तीने गाडीत बसवल आणि पळवून नेलं.


व्हायरल होत असलेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर कपडा बांधलेला एक तरुण मुलीला कारकडे ओढत आहेत.

तरुणीला त्याने मागच्या सीटवर ढकलून दिले. दुसरा एक व्यक्ती तिच्या वडिलांकडे गेला आणि त्यांना रोखलं.


या अपहरणाच्या घटनेनंतर मुलीच्या घरच्यांना थेट पोलिस ठाणं गाठलं आणि तक्रार दिली. पोलिसांचा तपास सुरु झाला. मात्र इकडे अपहरकर्त्या २४ वर्षीय तरुणाने मुलीसोबत लग्न लावलं आणि त्याचा व्हीडिओ आणि फोटोही तिच्या घरच्यांना पाठवले

ही घटना तेलंगणामधील आहे. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. अपहरणकर्त्यांच्या मागावर पोलिसांची सहा पथके रवाना झाली. पोलिस तपासामध्ये या घटनेतील तथ्य समोर आलेली आहेत.


ज्या तरुणाने तिचं अपहरण केलं होतं तो तिच्याच गावातील आहे. त्या दोघांची पूर्वी मैत्री होती. लग्नाच्या व्हीडिओमध्ये मुलीने सगळा खुलासा केला आहे. त्या दोघांचं एक वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. मात्र त्यावेळी ती अल्पवयीन असल्याने पालकांनी तक्रार दिली आणि पतीला तरुंगात टाकलं. आता मुलीचं वय १८ वर्षे झाल्याने दोघांनी मंदिरात जावून लग्न केलं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *