👁 6 Views

शिक्षक दारू पिऊन शाळेतच झिंगाट

 

शाळा म्हणजे भविष्यातील पिढी घडवण्याचे महत्वाचे ठिकाण आणि त्यातील शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी देवासमान असतात. मात्र हेच शिक्षक जर आपल्या मर्यादा सोडून वागत असतील तर विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा असा सवाल उपस्थित होतो.


कारण गोंदियात मद्यपी शिक्षकाच्या संतापजनक प्रतापाने सर्वजण हैराण झाले आहेत. एका शिक्षकाने चक्क दारू पिऊन शाळेत हजेरी लावली. एवढेच नाही तर मद्याने झिंगलेले शिक्षक वर्गातच फरशीवर लोळत पडले. यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


हा सर्व प्रकार गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या निंबा येथील प्राथमिक पूर्व माध्यमिक शाळेत घडला. तर दारू पिऊन वर्गातच लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार विद्यार्थांसमोरच घडला. या प्रकाराने सर्व विद्यार्थ्यांनी घाबरून पळत वर्गाबाहेर जात मुख्याध्यापक तथा पालकांना माहिती दिली.

दरम्यान, झिंगलेले शिक्षक शाळेतील वर्ग खोलीत फरशीवर आडवे झाले. आर. जी. मरस्कोल्हे असे मद्यधुंद शिक्षकाचे नाव आहे. यानंतर मद्यधुंद शिक्षकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांची वैद्यकीय तपासणी केली.


मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकाचे नाव ए. जी. मरसकोल्हे आहे. ते शाळेच्या वेळेतच दारू पिऊन झिंगाट होऊन आले. आणि शाळेत मद्यधुंद अवस्थेत पडलेले दिसले. अनेकांनी त्‍यांचा व्‍हिडीओ देखील केला. मिळालेल्या माहितीनुसार दरम्यान, पोलिसांनी या शिक्षकाविरूद्ध गुन्‍हा दाखल केला असून मद्यपी शिक्षकावर गोरेगाव ग्रामीण रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. शिक्षण विभागाने याची तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *