👁 6 Views

खंडणी न दिल्याने एकावर खुनी हल्ला

 

पंचवीस हजाराची खंडणी देण्यास नकार दिल्याने पान शॉप चालक दुर्गेश विलास पाटोळे (रा. शिवनगर, इस्लामपूर) यांच्यावर चौघांनी तलवार आणि चाकूने खुनी हल्ला केला.


शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी गणेश विलास पाटोळे यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनमोल मदने, गुरू जाधव, हर्षल घेवदे, साहिल जमादार (सर्व रा. इस्लामपूर) या संशयितांविरोधात खंडणी व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला.


पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गणेश पाटोळे यांच्या पान शॉपवर हे चार संशयित मावा, गुटखा खाण्यासाठी जात होते. मावा, गुटख्याचे पैसे देत नव्हते. पाटोळे यांनी त्यांच्याकडे उधारी मागितली होती. परंतु संशयितांनी पैसे देण्यास नकार देऊन उलट पाटोळे यांना चौघांनी 25 हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. 


खंडणी देण्यास पाटोळे याने नकार दिला. संशयितांनी पाटोळे यांच्या वडिलांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. पाटोळे याचा भाऊ दुर्गेश हा वडिलांना सोडविण्यासाठी गेला असता संशयित अनमोल मदने आणि गुरू जाधव यांनी तलवारीने दुर्गेश याच्यावर हल्ला केला व संशयित गुरू जाधव याने शिवीगाळ करत चाकूने दंडावर वार केल्याची फिर्याद आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *