👁 4 Views

लग्नासाठी हट्ट करणाऱ्या प्रेयसीला संतापलेल्या प्रियकरान लाथांनी मारलं, मग…..

 

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एका तरुणीला तिच्या प्रियकराने बेदम मारहाण केली. ही तरुणी त्या तरुणाकडे लग्नासाठी हट्ट करत होती. या गोष्टीचा तिच्या प्रियकराला राग आला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


त्यानंतर आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारहाण झालेल्या युवतीचं वय १९ वर्षे आहे.


बुधवारी झालेल्या कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं. पीटीआयच्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मऊगंज भागातील रहिवासी आहे. युवती आणि आरोपी युवकामध्ये प्रेमसंबंध होते. त्यांच्यात वाद झाला, त्यानंतर आरोपी प्रियकरानं मुलीला बेदम मारहाण केली. व्हिडिओमध्ये मुलगी तिच्या प्रियकराकडे लग्नासाठी हट्ट करत होती. मुलीच्या हट्टामुळे आरोपी प्रियकराचा संताप अनावर होतो आणि तो चिडतो. त्यानंतर प्रेयसीच्या केसांना पकडून तो जमिनीवर फेकतो आणि मारहाण करतो असं उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीओपी) नवीन दुबे यांनी सांगितले.

व्हिडिओत आरोपी प्रियकर मुलीच्या अंगावर लाथा मारताना दिसत आहे. त्याने लाथ मारून तिच्या चेहऱ्याला दुखापत केली. तो मुलीवर अत्याचार करतानाही दिसतो. त्याच वेळी, मुलीला मारहाण केल्यानंतर, तो तिला पुन्हा जमिनीवरून उचलतो. मात्र मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसते.



मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे तिच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. या घटनेबाबत मुलगी आणि तिच्या कुटुंबियांकडून माहिती गोळा करण्यात आली आहे. प्रकरण प्रेमसंबंधाचे आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले आणि त्यानंतर सोडून दिले. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी आरोपींविरुद्ध आणखी कलमे लावत गुन्हा नोंद केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *