👁 7 Views

कोयत्याने वार केल्यामुळे चुलत भाऊ , भावजय जखमी

 

सदाशिवगड-वनवासमाची (ता. कराड) येथे सोमवार दि. 26 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गाडी लावण्याच्या कारणावरुन झालेल्या वादावादीनंतर एकाने चुलत भावासह भावजयीवर कोयत्याने वार केले.


याबाबत रेखा मारुती कुंभार यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश भगवंत कुंभार याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सदाशिवगड- वनवासमाची येथील मारुती कुंभार यांचा त्यांच्या घराशेजारी राहणारा चुलत भाऊ रमेश कुंभार याच्यासोबत जुना वाद आहे. शनिवारी गाडी लावण्याच्या कारणावरुनही त्यांच्यात वाद झाला होता.


 दरम्यान, सोमवारी सकाळी रमेश कुंभार याच्याकडे मारुती कुंभार यांचा मुलगा सचिन जाब विचारण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने हातातील कोयत्याने चुलत भाऊ मारुती कुंभार व भावजय रेखा कुंभार यांच्यावर वार केले. यामध्ये ते दोघेही जखमी झाले. याबाबतची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली असून पोलीस तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *