👁 7 Views

मंगळवेढा: 65 वर्षीय महिलेच्या विनयभंग , एकाविरूध्द गुन्हा दाखल

 

तूझा भाऊ पैसे कधी देणार अशी विचारणा करीत एका 65 वर्षीय महिलेच्या दोन्ही दंडाला धरून लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी परमेश्‍वर येणपे(रा.नंदूर) याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील पिडीत महिला तथा फिर्यादी ही तीच्या गावी खुपसंगी येथील शेतात असताना दि.24 रोजी 4.00 वा.


यातील आरोपी परमेश्‍वर येणपे याने फिर्यादीजवळ येवून तुझा भाऊ पैसे कधी देणार आहे असे म्हणून शिवीगाळ करीत पिडीतेच्या दोन्ही दंडाला धरून

तुला मी विहिरीत ढकलून देतो, तुइयावर बलात्कार करतो असे म्हणून पिडीतेचा ब्लाऊज ओढून तीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून


डाव्या हातावर काठीने मारून जखमी करून तुला जीवंत सोडणार नाही असे म्हणून निघून गेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *