👁 6 Views

लग्नाच्या दिवसी बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती नवरी , नवरदेवाला समजलं आणि मग….

 

लग्नाचा दिवस होता. नवरी-नवरदेव दोघेही तयार झाले होते. तेव्हाच अचानक नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला. त्याचं म्हणणं होतं की, नवरी लग्नाच्या दिवशी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती.


ऐकून लग्नासाठी आलेले पाहुणे हैराण झाले. तेच नवरी रडायला लागली होती.

ही घटना घानाच्या कसोआमधील आहे. नवरीला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत ती रडताना दिसत आहे. ती नवरदेवाला आणखी एक संधी देण्याची विनंती करताना दिसत आहे. पण नवरदेव तिच्यापासून दूर दिसतो आहे. नवरीचा हा व्हिडीओ आधी टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. जो आता व्हायरल झाला आहे.


डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, नवरी आणि नवरदेवाच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण हे सांगण्यात आलं की, लग्नाच्या दिवशी नवरी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती. हे नवरदेवाला कुणीतरी सांगितलं होतं. त्यानंतर नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला. नवरदेवाचा हा निर्णय ऐकून नवरीला धक्का बसला आणि ती रडू लागली.


व्हिडीओवर लोकांच्याही अनेक कमेंट्स आल्या आहेत. कुणी म्हणाले की, नवरदेवाने अगदी योग्य केलं. तर कुणी म्हणाले त्याने नवरीला एक संधी द्यायला हवी. एकाने लिहिलं की, सगळ्यांचा भूतकाळ असतो. त्यातून शिकायला हवं.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *