👁 6 Views

मुलीवर अत्याचार केले, मग तिच्याच घरी फोन करून भलतेच सागितले ; चहा घेताना पकडले

 

इन्स्टाग्रामवर मैत्री करून १३ वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीला पोलिसांनी मंगळवेढा येथून रविवारी सकाळी १० वाजता चहा पीत असतानाच ताब्यात घेतले आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगीराज राजकुमार वाघमारे (रा. मोहोळ, जि. सोलापूर) याने एका शालेय शिक्षण घेणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली. तिला वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचे सांगितले.


 तिला इन्स्टाग्रामवर अनेक मेसेज चॅटिंग करून फूस लावली. तिला १४ डिसेंबर रोजी पंढरपूर येथे बोलावून तेथून कोल्हापूर येथे नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिच्या घरच्यांना तुमची मुलगी घर सोडून जाताना मला सापडली असे सांगितले. तुम्ही तिला घ्यायला या, असे फोन करून सांगितले त्या मुलीला तिच्या घरच्यांच्या ताब्यात दिले. दोन-तीन दिवसांनंतर मुलीने घडलेला प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला.


सदर प्रकरणानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून योगीराज वाघमारे याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून पोउपनि प्रशांत भागवत त्याच्या शोधात होते. तो मंगळवेढा येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर त्यांनी तत्काळ मंगळवेढा गाठले. योगीराज चहा पीत बसल्याचे त्यांना आढळून आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *