👁 4 Views

मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात चक्क 20 साप अडकले

 

यावर्षी चांगला पाऊस झाल्याने नदी, नाले तुडुंब भरली आहेत. त्यामुळे यंदा माशांचे  प्रमाण देखील वाढलेले आहेत. त्यामुळे मच्छीमार  सद्या पहाटेच जाळे लावून मासे पकडत आहे.


दरम्यान औरंगाबादच्या एका मच्छीमारासोबत वेगळाच प्रकार घडला आहे. या मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क साप  अडकले. विशेष म्हणजे एक-दोन नव्हे तर तब्बल 20 साप अडकल्याने मच्छीमाराची भंबेरीच उडाली. त्यामुळे अखेर सर्पमित्र्याच्या मदतीने या सापांची सुटका करण्यात आली.


नदी किंवा तलावात मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात बऱ्याचदा कचरा अडकल्याच्या घटना घडतात. पण औरंगाबादच्या एका मच्छीमाराच्या जाळ्यात साप अडकले. मंगळवारी विटावा शिवारातील तलावात ही घटना घडली. नेहमीप्रमाणे परिसरातील मच्छीमारांनी तलावात जाळे टाकले होते. 


मात्र जेव्हा पुन्हा तलावात येऊन जाळे बाहेर काढले तर या मच्छीमारांना धक्काच बसला. कारण जाळ्यात मासे नव्हे तर साप अडकले होते. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर चक्क 20 साप एकाचवेळी जाळ्यात अडकले होते. त्यामुळे एवढे मोठे साप पाहून मासेमारी करणाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर सर्पमित्रांना बोलावून घेण्यात आले. परंतु यातील 20 पैकी 6 सापांचा मृत्यू झाला होता, तर 14 सापांचा जीव वाचविण्यात यश आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *