12 वर्षाच्या मुलीचा बालविवाह केला. चार महिन्याची गरोदर मुलगी दवाखान्यात गेल्याने बिंग फुटले. मुलीच्या आई विरुद्ध ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारा वर्षाच्या मुलीचा केला बालविवाह
यवतमाळ : खेळण्याबागडण्याच्या कोवळ्या वयातच एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला. यात पीडित बालिका ही चार महिन्याची गरोदर राहिली.
परंतु दवाखान्यात उपचारासाठी गेल्याने सर्व प्रकार उजेडात आला. या प्रकरणात पतीसह पिडीतेच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मारेगाव तालुक्यातील एका गावामध्ये आज उघडकीस आली.
बालविवाह प्रथा रोखण्यासाठी स्वातंत्र पूर्व काळा पासून अनेकांनी संघर्ष केला. यासाठी इंग्रज शासना सोबत अनेक समाज सुधारकांनी लढा दिला. या विरुद्ध शासनाने ही कडक कायदे केले आहे. प्रशासन ही वेळोवेळी बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करीत असतात. तरीही समाजात आज ही प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून बालविवाह होत असल्याचे यातून निदर्शनास येते. असाच काही प्रकार आज मारेगाव पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली.
येथिल एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह 5 महिन्या पूर्वी म्हणजेच 18 जुलै 2022 ला नागपूर जिल्ह्यातील एका मुलासोबत लावून दिला. त्यावेळेस मुलीचे वय अवघे 12 वर्षाचे होते.
लग्नानंतर पिडीत बालिका ही चार महिन्याची गरोदर झाली. त्यानंतर आईने चार महिन्याच्या आपल्या गरोदर मुलीला आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेले, यावेळी डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत याविरुद्ध मारेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी पिडीतचे आई व नागपूर जिल्हातील पतीविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो, बलात्कार आदी कलमा अन्वये गुन्हे दाखल केले आहे.



