प्रतिनिधी- पंढरपूर: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला या ठिकाणी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट लीगचे उद्घाटन करण्यासाठी संस्थेचे चेअरमन मा. श्री. रोहन परिचारक तसेच प्रशालेच्या प्राचार्या मा. सौ. प्रियदर्शनी सरदेसाई या उपस्थित होत्या.
या क्रीडा सप्ताहाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पालक व शिक्षक यांच्यामधील झालेला क्रिकेट सामना. या क्रिकेट सामन्याची कल्पना प्रशालेच्या प्राचार्या मा. सौ. प्रियदर्शनी सरदेसाई यांची होती. या क्रिकेट लीग साठी प्री प्रायमरी, प्रायमरी,सेकंडरी च्या सर्व पालकांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला. या क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिला सामना संघ अ व संघ ब यांच्यामध्ये झाला. यामध्ये संघ अ यांच्या 70 धावा 7 गडी बाद तर संघ ब चे 49 धावा 10 खेळाडू बाद असा सामना झाला.
यामध्ये मॅन ऑफ द मॅच श्री. यशवंत वाघ हे होते. यानंतर लगेच दुसरा सामना संघ अ व शिक्षक यांच्यात झाला. यामध्ये अ संघाने 157 धावा दोन खेळाडू बाद तर शिक्षक संघाने 89 धावांमध्ये सर्व खेळाडू गमावले होते. हा सामना संघ अ यांनी 68 धावांनी जिंकला होता. यानंतर दुसरे दिवशी ब्राम्होस संघ विरुद्ध तेजस संघ या पालकांच्या सामन्यांमध्ये 7 षटकांचा सामना घेण्यात आला. यामध्ये ब्राह्मोस संघाचे कर्णधार श्री. सज्जन भोसले होते तर तेजस संघाचे कर्णधार श्री. निलेश शेंडे हे होते या सामन्यामध्ये ब्राह्मोस संघाने दोन खेळाडूंच्या बदल्यात 92 धावा केल्यातर तर तेजस संघाने 93 धावा करून दोन खेळाडू गमावले व 8 खेळाडू राखून हा सामना जिंकला. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच श्री. निलेश शेंडे ठरले. त्याच दिवशी दुसरा सामना तेजस संघ विरुद्ध विक्रांत संघ यांच्यात झाला. सात षटकांच्या या सामन्यात तेजस संघाचे कर्णधार श्री. निलेश शेंडे तर विक्रांत संघाचे कर्णधार अजित अभंगराव हे होते.
या सामन्यात तेजस संघाने 120 धावांमध्ये आपले 2 खेळाडू गमावले तर विक्रांत संघाने 87 धावा करत आपले 2 खेळाडू गमावले आणि हा सामना तेजस संघाने 33 धावांनी जिंकला. त्यानंतर लगेच पुढचा सामना तेजस संघ विरुद्ध शिक्षक यांच्यामध्ये झाला. हा सामना देखील सात षटकांचा होऊन यामध्ये तेजस संघाने सात षटकांमध्ये 76 धावा करत 6 खेळाडू गमावले तर शिक्षक संघाने 7 षटकांमध्ये 60 धावा करत 6 खेळाडू गमावले आणि हा सामना तेजस संघाने 16 धावांनी जिंकला. यामध्ये मॅन ऑफ द मॅच श्री.प्रमोद क्षीरसागर हे होते.
पुढील दिवसाचा सामना अग्निसंघ विरुद्ध शिक्षक संघ यांच्यामध्ये झाला. यामध्ये अग्निसंघाचे कर्णधार श्री. विकास माने तर शिक्षक संघाचे कर्णधार श्री. सुधीर गोडसे सर होते. यामध्ये अग्निसंघाने 7 षटकांमध्ये 93 धावा करत 2 खेळाडू गमावले तर शिक्षक संघाने 7 षटकांमध्ये 93 धावा करत 2 खेळाडू गमावले ,तर शिक्षक संघाने 7 षटकांमध्ये 94 धावा करत 2 खेळाडूंच्या बदल्यात हा सामना जिंकला. या सामन्यात श्री. आकाश साबळे सर हे मॅन ऑफ द मॅच होते. यानंतर केव्ही क्रिकेट क्लब चा महाअंतिम सामना तेजस संघ विरुद्ध विक्रांत संघ यांच्यामध्ये 7 षटकांचा झाला यामध्ये विक्रांत संघाचे कर्णधार श्री. अजित अभंगराव यांच्या संघाने 7 षटकांमध्ये 4 खेळाडूंच्या बदल्यात 72 धावा केल्या तर तेजस संघाने 5 खेळाडू गमवत 74 धावा करून महाअंतिम सामना जिंकला. यावेळी तेजस संघाचे कर्णधार निलेश शेंडे हे होते. तर मॅन ऑफ द मॅच श्री.अमित पाटेकर हे झाले. असा हा आगळावेगळा क्रिकेट लीग चा उपक्रम कर्मयोगी विद्यानिकेतनपंढरपूर या ठिकाणी संपन्न झाला. संपूर्ण क्रिकेट लीग मध्ये क्रिकेट समालोचनाचे काम श्री. गिरीश खिस्ते सर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



