👁 7 Views

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये ‘ग्राहक पंचायतचा कार्यक्रम’ उत्साहात संपन्न


पंढरपूर- येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक पंचायत चा कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ग्राहक पंचायत पंढरपूर तालुकाध्यक्ष श्री. विनय उपाध्ये हे उपस्थित होते. तसेच त्यांच्याबरोबर तालुका उपाध्यक्ष श्री. नंदकुमार देशपांडे व जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री अण्णा ऐतवाडकर आणि अल्लापुरकर गुरुजी हे देखील उपस्थित होते. 


      यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या प्राचार्या मा.सौ. प्रियदर्शनी सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. 


यावेळी प्रास्ताविकात प्रमुख पाहुणे श्री. विनय उपाध्ये यांनी ग्राहक हा समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असून या ग्राहकाचे हक्क अबाधित राहण्यासाठी श्री. बिंदू माधव जोशी यांनी स्थापन केलेल्या ग्राहक पंचायत चे महत्त्व सांगितले. तसेच तालुका अध्यक्ष श्री नंदकुमार देशपांडे यांनी ग्राहक पंचायतने निर्माण केलेले कायदे व या कायद्यांचा ग्राहकांना होणारा उपयोग विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. “अगदी ऑनलाईन खरेदीमध्ये सुद्धा आपली फसवणूक झाल्यास आपण ग्राहक पंचायत कडे तक्रार करू शकतो.” ही माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. 


      यावेळी सर्व अभ्यागतांचे स्वागत प्रशालेच्या प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्री. गिरीश खिस्ते सर यांनी केले. तर आभार श्री. अण्णा ऐतवाडकर यांनी मानले. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा हा राष्ट्रीय ग्राहक दिन आज कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *