बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी 88 हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून 2 लाख 45 हजारांचा ऐवजावर डल्ला मारला. ही घटना 28 डिसेंबरला मांजरी बुद्रूकमधील व्ही आर टॉवरमध्ये घडली आहे.
याप्रकरणी महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कुटूंबियासह व्ही आर टॉवरमध्ये राहायला आहे. 28 डिसेंबरला सकाळी नउच्या सुमारास त्या बाहेर गेल्या होत्या.
त्यावेळी चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून 88 हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून 2 लाख 45 हजारांचा ऐवज चोरून नेला.
बाहेरहून आल्यानंतर महिलेला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेउन तक्रार नोंदविली. सहायक पोलीस फौजदार नानासाहेब जाधव तपास करीत आहेत.



