👁 8 Views

स्टेजवरून नवरीला उचलून आणण्याचा प्रयत्न नवरदेवाच्या चांगलाच अंगलट आला , फजिती पाहून हसू आवरणार नाही

 

विवाह म्हटलं की अनेक गंमती-जमती आल्या. काही राग आणतात तर काही पोट धरुन हसायला लावतात. हल्ली लग्नांमध्ये नवरदेवाने नवरीला उचलून घेण्याचा, नवरा-नवरीने स्टेजवर डान्स करण्याचा ट्रेंड वाढलेला पहायला मिळतोय.


सध्या सोशल मीडियावर एका लग्नातील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट हसल्याशिवाय राहणार नाही. लग्नानंतर स्टेटवरुन खाली उतरत असताना नवरदेव नवरीला उचलून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचा हा प्रयत्न त्याच्या चांगलाच अंगलट आल्याचे दिसते.


नवरदेव स्टेजवर आपल्या नववधूला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तो नवरीला उचलतोही, मात्र त्याला स्वतःचा तोल सावरता येत नाही आणि नवरीसह तो ही खाली धाडकन पडतो.


स्टेजखाली उपस्थित अनेक वऱ्हाडी नवरा-नवरीचा तो क्षण मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी सज्ज होते. मात्र नवरदेवाच्या करामतीने चांगलीच फजिती झाली आणि ती कॅमेऱ्यात कैदही झाली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *