कंधार : फुलवळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सोमासवाडी येथील रहीवासी बालाजी (बाळू) किशनराव रासवते वय ४२ वर्षे हे लेक राजश्री राजेश श्रीमंगले (लहानकर) वय २२ वर्षे हिस माहेर आणण्यासाठी दि.२ जानेवारी सासर उदगीर येथे गेले होते़.
आपल्या लेकीला आपल्या दुचाकीवरून उदगीरवरून जळकोट जांब मार्गे फुलवळकडे येत असताना रात्री १० च्या सुमारास जळकोट पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या पाटोदा (खू.) पाटीजवळ त्यांच्या दुचाकीचा जबर अपघात झाला.
यात बापासह लेकीचा दुचाकी अपघातात दुर्दैवी अंत झाला़. सदरच्या अपघाताची नोंद जळकोट पोलिस स्टेशनला करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक पी.बी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. चिमंदरे हे करीत आहेत.
बालाजी रासवते यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सोमासवाडीसह फुलवळमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.



