👁 10 Views

श्री विठ्ठल प्रशालेत पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेचा समारोप समारंभ संपन्न

श्री विठ्ठल प्रशाला व कला, विज्ञान कनिष्ट महाविद्यालय, वेणूनगर, ता. पंढरपूर येथे रविवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व्दारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित तालुका क्रीडा अधिकारी, पंढरपूर व श्री विठ्ठल सहसा कारखाना लि. वेणुनगर व श्री विठ्ठल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, वेणुनगर ता. पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मा. श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार माडा लोकसभा मतदार संघ यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थान मा. श्री. मा. आ. नारायण (आबा) पाटील यांनी भूषविले. 


 02 जानेवारी 2023 रोजी आयोजित केलेल्या स्पर्धेचा समारोप समारंभ श्री विठ्ठल सहसा कारखान्याचे व प्रशाला कमिटीचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी महादेव कसगावडे उपसंचालक क्रीडा व युवक संचालनालय पुणे नितीन तारळकर जिल्हा क्रीडा अधिकारी  सत्येन जाधव तालुका क्रीडा अधिकारी, गणेश पवार सर राज्य अॅथलेटिक्स क्रीडा मार्गदर्शक श्री विठ्ठल सहसा कारखान्याचे व्हा चेअरमन सौ. प्रेमलता रोगे, प्राचार्य बी. पी. रोगे. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड, महाराष्ट्र केसरी छोटा मगर पे रावसाहेब मगर उपमहाराष्ट्र केसरी पै.भरत मेकाले प्रमुख उपस्थित होते.


यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निवाळकर स्पर्धक खेळाडूना उदेशुन म्हणाले की कोणत्याही खेळात प्रामाणिकपण मेहनत केल्यास यश मिळतेच हे प्रतिकुल परिस्थितीतूनच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविल्याचे पे करतासंग पे खशाबा जाधव यांचे उदाहरण देवून सांगितले. श्री विठ्ठल सहसा कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील स्पर्धेच्या उद्धघाटनाप्रसंगी बोलताना म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेचे असून त्या स्पर्धेत टिकून राहावयाचे असेल तर अभ्यासाबरोबरच


व्यायामाची गरज आहे म्हणूनच जगाच्या स्पर्धेमध्ये तसेच ऑलम्पिकमध्ये भारताला स्थान मिळवायचे असेल

तर खेळाडूना चांगल्या शिक्षणाबरोबर आर्थिक ताकद देण्याची गरज असल्याचे सांगितले. या प्रसंगी नारायण (आबा) पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज खेळाडूना खऱ्याअर्थाने शिष्यवृत्ती देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री विठ्ठल सह. सा. कारखान्याच तज्ञ संचालक प्रा. तुकाराम मस्के यांनी केले तर प्रमुख पाहुण्याचे स्वागत श्री विठ्ठल प्रशालेचे प्राचार्य विठ्ठलराव नागटिळक यांनी केले. यामध्ये पुणे शहर पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, अहमदनगर शहर व ग्रामीण सोलापूर शहर व ग्रामीण या जिल्हयातील नामवंत 480 कुस्ती खेळाडूनी भाग घेऊन डोळयाचे पारणे फेडणाच्या कुस्त्या करून कुस्तीरसिकांना मंत्रमुग्ध केले सर्व विजेत्यांना ट्रॉफी, सन्मानचिन्ह व रोख रक्कमेच पारीतोषक मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले. या पुणे विभागीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेचे पंच म्हणून धनराज भुजबळ, अंकुश अकले नितीन शिंदे, राजेंद्र कनसे, तानाजी कसर, जितेंद्र कनसे यांनी उत्कृष्टपणे काम केले.

या प्रसंगी श्री विठ्ठल सहसा कारखान्याचे सर्व संचालक, संचालक विभिषण पवार, पंढरपूर केसरी

सोमनाथ सूर्य शेखर भोसले, सपाटे सर, नागेश यादव, दुर्गतगावचे सरपंच डॉ. अमृता रणदिवे अजोतीगावचे सरपंच

अमरजीत पवार कारखान्याचे अधिकारी कामगार सभासद पालक शेतकरी उपस्थित होते.. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य व्ही. जी. नागटिळक याच्यासह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कुस्ती स्पर्धचे समालोचन राजु देवकते व प्रमोद माळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा चहाण एस. बी तर पर्यवेक्षक नागणे एस.के यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *