👁 5 Views

Loksabha Election : मतदार यादीतील नाव शोधणे, मतदार यादीतील अनुक्रमांक यासह नागरिकांना निवडणूक विषयी माहितीसाठी पंढरपुरात दोन ठिकाणी मतदार मदत कक्ष सुरू

 

पंढरपूर, दि:18-  नागरिकांना निवडणूविषयक माहिती आणि तक्रारींचे निवारण  करण्यासाठी 42 सोलापूर (अ.जा.) लोकसभा मतदार संघातर्गंत 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये सांस्कृतिक भवन, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे मतदार मदत कक्ष सुरु करण्यात आला  आहे. सदर मतदार मदत कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 02186-299099 असून हा मदत कक्ष  चोवीस तास सुरु राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे  यांनी दिली.

          सदर मतदार मदत कक्षातील हेल्पलाईन क्रमांकावर मतदार यादीतील नाव शोधणे, मतदार यादीतील अनुक्रमांक आदीबाबत आवश्यक असलेली माहिती तात्काळ देण्यात येणार असून, नागरिकांनी  या उपलब्ध सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी इथापे  यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *