👁 7 Views

अरे यांना आवरा रे…. डान्स करतानाच काढायला लागला खुन्नस , मित्राला उचलून फेकल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

 

सध्या सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, शिवाय आपले व्हिडीओ व्हायरल व्हावे त्याला लाईक्स मिळाव्या म्हणून लोक कुठेही आणि कसेही नाचताना दिसत आहेत. नुकतेच नेटकऱ्यांना ‘पतली कमरीया मोरे हाय हाय’ या भोजपुरी गाण्याने अक्षरश: वेड लावल होतं


हिंदी गाण्यावर थिरकणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मात्र, ग्रामीण भागातील काही लोकांचे डान्स असे असतात ते डान्स कमी आणि हाणामारी जास्त असल्याचं दिसून येतं

सध्या अशाच दोन तरुणांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डान्सच्या नावाखाली एक तरुण त्याच्यासोबत नाचणाऱ्या मुलाला वाईट पद्धतीने उचलून फेकताना दिसत आहे. खरंतर लग्न समारंभात अनेकजण मनमोकळेपणाने नाचत असतात. काही त्यांच्या जबरदस्त डान्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात, तर काहींचा डान्स पाहून आपणाला हसू आवरणं कठीण होतं. तर अनेकांचे डान्स पाहून लोक हैराण आणि अस्वस्थ होतात, त्याच पद्धतीचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.


व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोघेजण अत्यंत विचित्र पद्धतीने डान्स करताना दिसत आहेत. बघणाऱ्यांना ते दोघे डान्स करत आहेत की भांडण हेच लक्षात आलेलं नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क व्हाले आहेत. हा व्हिडिओतील दृश्यांवरुन ते दोघं एका लग्न समारंभादरम्यान दबंग चित्रपटातील सलमान खानच्या हिट टायटल ट्रॅकवर डान्स करताना दिसत आहेत.


पण गंमत म्हणजे नाचताना एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्या खांद्यावर घेऊन फेकताना दिसत आहे. त्यामुळे हे दोघे नाचत आहेत की कुस्ती खेळत आहेत असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. हा कुस्ती पद्धतीचा डान्स पाहून तिथे उपस्थित असणाऱ्यांनाही काही काळ ही भांडण सुरु झाली की काय असा प्रश्न पडला होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरण कठीण झालं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *