👁 6 Views

वाहतूकीचे नियम पाळा: कारवाई टाळा

पंढरपूर सिंहगड काॅलेज व रोटरी क्लब वतीने वाहतूक नियमावली मार्गदर्शन 

पंढरपूर: प्रतिनिधी 

‘वाहतुकीचे नियम शाळा, महाविद्यालय स्तरावर मुलांना शिकवणे आवश्यक आहे. मुलांना नियम समजल्यानंतर ते आपल्या कुटुंबियांना समजवून सांगतात.


 त्यासाठी मुलांना सुरक्षिततेचे नियम सांगणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रस्त्यावर वाहतूक पोलिस दिसत नसले तरी त्यांचे लक्ष आपल्यावर असते. 


वाहन चालविताना नियमांचे पालन करावे. वाहतूक नियम पाळा अन् कारवाई टाळा असे आवाहन पंढरपूर पोलीस स्टेशन कडून सिंहगड कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना करण्यात आले. अशी माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


   एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये बुधवार दिनांक ४ जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिनानिमित्त वाहतूक सप्ताह तसेच “वाईज रायडर्स” निमित्त रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमावलीत बाबत जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले.


 हे मार्गदर्शन पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरूण फुगे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल कुंभार, पोलीस जाधव यांनी मार्गदर्शन केले.    

 यादरम्यान रोटरी क्लब ऑफ पंढरपूर व सिंहगड कॉलेजच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


 यावेळी पोलीस काॅन्टेबल अंकुश माळी, विनोद पाटील, प्रविणुकुमार सोनवणे, रो. विश्वास आराध्ये आदी उपस्थित होते. 

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *