👁 7 Views

धक्कादायक! गुन्हेगारीच भयान वास्तव, दोन तरुणांची नजरेला नजर भिडली अन्

 

    पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे भयान वास्तव सध्या पुणेकर अनुभवत असून, केवळ दोन तरुणांची नजरेला नजर भिडल्यानंतर वाद झाला व एका तरुणाने दुसऱ्यावर सुरी सारख्या हत्याराने वार करून त्याला जखमी केल्याची घटना घडली. कदमवाक वस्तीत हा प्रकार घडला आहे. 


    या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शिवम राखुंडे (वय २३) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी धीरज कांबळे (वय २३) व गणेश अनिल पांढरेकर (वय २१) यांना अटक केली आहे.


    तिघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. कदमवाक वस्तीतील एका प्रसिद्ध चहाच्या दुकानी ते एकत्र आले होते. त्यावेळी धीरज व शिवम यांची नजरेला नजर भिडली. 

    त्यातून त्या दोघांत वाद झाले. त्यानंतर शिवमने त्यांना फोन करून तुझा काही तरी गैरसमज झाला आहे, असे म्हणत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. 


    पण, धीरजने त्याला भेटण्यासाठी म्हणून बोलावले. शिवम त्याच्या मित्रांसोबत तेथे गेल्यानंतर धीरज व गणेशने त्याला मारहाण करत सुरीने वार केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *