👁 5 Views

चार महिन्यांच्या चिमुरड्यासमोरच आईने जीवन संपवले

 

चार महिन्यांच्या चिमुरड्यासमोर रुबिना रेहमत या अवघ्या २२ वर्षांच्या आईने जीवन संपवले. ही धक्कादायक घटना धारावी राजीव गांधी नगरमधील ओम साई चाळीत गुरुवारी मध्यरात्री घडली आहे.


शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रुबीना रेहमत गेल्या एक वर्षांपासून पती व दोन मुलांसह या चाळीत रहात होती.


रुबिना हिंदू असून तिने रेहमतशी प्रेमविवाह केला आहे. रेहमत कन्स्ट्रक्शन साईटवर हेल्परचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असताना त्याला दारूचे व्यसन जडले. यावरून पती-पत्नीत खटके उडत. मात्र दुसऱ्या दिवशी ते जमवून घेत. त्यामुळे शेजान्यांनीही त्यांच्या भांडणांकडे दुर्लक्ष केले होते. 


बुधवारी रात्री रेहमत कामावरून आला आणि पत्नी मुलांसह जेवण करून झोपी गेला. रात्री दीडच्या सुमारास ४ महिन्याचा चिमुरडा मोठ्याने रडू लागल्याने त्याची झोपमोड झाली. त्याने उठून घरातील लाईट लावले असता पत्नीने ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले. 

जोराने ओरडत त्याने पत्नीचा गळफास सोडवून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आवाजाने शेजारी ही धावले. दोन चिमुरड्यांना शेजाऱ्यांच्या हाती सोपवून रुबीनाला शिव रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुबीनाने जीवन का संपवले. हे स्पष्ट नसल्याने धारावी पोलीस चक्रावून गेले आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *