👁 6 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा मेळावा

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.


   या पालक मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, सोमनाथ नवले, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, पालक प्रतिनिधी दामोदरे सर व खांडेकर मॅडम, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर, प्रा. अनिल निकम आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


    या पालक मेळाव्यात सोमनाथ नवले, पालक प्रतिनिधी दामोदरे सर व खांडेकर मॅडम यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

    प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम  विद्यार्थी व पालकांना संबोधित करताना म्हणाले, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा अभ्यास अवघड असतो परंतु नियोजन करून नियमित अभ्यास केल्यास यश निश्चित प्राप्त होईल. अल्पावधीतच प्रथम वर्षाचा शैक्षणिक लेखाजोखा प्रा. अनिल निकम यांनी पालकांसमोर सादर केला.

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर बोलताना म्हणाले, प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जापनीज भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार असुन या जापनीज कंपनी सोबत सिंहगड महाविद्यालयाचा सामंजस्य करार झाला आहे. या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत नोकरी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त इतर स्पर्धेत ही विद्यार्थ्यांनी सहभागी होणे आवश्यक आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षांपासून मोफत ट्रेनिंग देण्यात येत असुन याचा फायदा विद्यार्थ्यांना कंपनीत प्लेसमेंट होणेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. सिंहगड संस्थेचे शैक्षणिक जाळे मोठे असल्याने विद्यार्थ्यांना अनेक नामांकित कंपनीत नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय महाविद्यालय विद्यार्थ्यांना उद्योजक क्षेञात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध करू देत आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरीसाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली जात असल्याचे मत डॉ. समीर कटेकर यांनी व्यक्त केले.


महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सिंहगड कॉलेज प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळया संधी महाविद्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महाविद्यालयाला विविध क्षेत्रातील उत्कृष्ट मानांकन मिळले आहेत. याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाला आहे. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक संशोधन करीत आहेत. स्टार्टअप पाॅली महाविद्यालयाकडून राबविली जात असल्याचे मत उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

   या पालक मेळाव्यात पालक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी उत्तरे दिली. यादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी संबोधित केले.

   या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. शिवाजी पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अक्षय सावंत यांनी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *