👁 6 Views

पत्नीचा खून करून पेटवले

 

उमरखेड तालुक्यातील पोफळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळअसोली शेतशिवारातील सोयाबीनच्या कुटारात महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत गुरुवारी (दि.५) आढळून आला.


यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेत पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा कामी लावत या प्रकरणाचा उलगडा केला. शारीरिक संबंधास विरोध करत असल्याने पत्नीचा खून करून तिला जाळून टाकल्याची कबुली आरोपी पतीने शुक्रवारी (दि.६) पोलिसांना दिली. 


शेतातील सोयाबीनच्या कुटारात एक अर्धवट जळालेला मानवी मृतदेह आढळून आल्याची माहिती माळ येथील सरपंच यांनी काल गुरुवारी पोफाळी पोलीस स्टेशनला दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली. हातात बांगड्या असल्याने मृतदेह महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर घटनास्थळाशेजारी शेत असलेल्या संजय साखरे यांची पत्नी मायाबाई साखरे या सकाळपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी पती संजय साखरेला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली.


मागील बऱ्याच दिवसांपासून पत्नी शारीरिक संबंधास नकार देत असल्यामुळे रागाच्या भरात नायलॉन दोरीने गळा आवळला. दगडाने तिच्या छातीवर वार केल्याने तिचा मृत्यू झाला. तो तिला शेजारच्या शेतातील सोयाबीनचे कुटाराकडे घेऊन गेला आणि तिचा मृतदेह जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अशी कबुली आरोपी पतीने दिली. गुन्हा कबूल केल्याने पोलिसांनी पती संजय साखरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *