👁 5 Views

कर्मयोगी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण

  झेंसार टेक्नॉलॉजी सोबत सामंजस्य करारा चा विद्यार्थ्यांना फायदा.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे पंढरपूर व सॉफ्टवेअर क्षेत्रातील नामांकित  कंपनी झेंसार  टेक्नॉलॉजी मध्ये केलेल्या सामंजस्य करारा अंतर्गत  विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात सुरुवात झाली असून यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना  नोकरी साठी आवश्यक असणारे उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. 


याचा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये खूप मोठा फायदा होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री रोहन परिचारक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.


यासंदर्भात माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की अभियांत्रिकी  विद्यार्थ्यांचे  बहुराष्ट्रीय  कंपनीमध्ये निवड होण्याचे एक स्वप्न असते परंतु त्यासाठी शैक्षणिक गुणवत्ते बरोबर च इतर ही कौशल्ये विद्यार्थ्यांच्या अंगीभूत असणे ही आवश्यक असते. 


झेंसार कंपनीचे अधिकारी श्री गुरुराजा कुलकर्णी यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, डॉ अभय उत्पात, प्रा. मोहसिन शेख, प्रा दीपक भोसले आदी.

यासाठी कर्मयोगी महाविद्यालयाने झेंसार टेक्नॉलॉजी या कंपनी सोबत सामंजस्य करार केला होता आणि आता या अंतर्गत कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स  अँड टेलीकम्युनिकेशन या विभागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच या करारा द्वारे कर्मयोगीच्या प्राध्यापकांना देखील प्रशिक्षित केले जाणार आहे. 

विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे  एप्टिट्यूड स्किल, सॉफ्ट स्किल, इंटरव्ह्यु स्किल, टेक्निकल स्किल इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण एंप्लोयबिलिटी स्किल डेव्हलमेंट च्याअंतर्गत मोफत दिले जात आहे. यावेळी प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी झेंसार कंपनी चे मॅनेजर श्री गुरुराजा कुलकर्णी यांचे सत्कार करून स्वागत केले.


 यावेळी गुरुराजा कुलकर्णी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदशन केले.  प्रा.मोहसीन शेख यांनी या प्रशिक्षणा मागील उद्देश व महत्त्व विद्यार्थ्यांना विषद केले. यावेळी झेन्सार कंपनीकडून विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी सुमारे ३५० हून अधिक पुस्तके महाविद्यालया ला देण्यात आली.

 या कार्यक्रमावेळी संस्थेचे चेअरमन रोहन परिचारक, प्राचार्य डॉ एस.पी.पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ ए. बी कणसे, रजिस्ट्रार श्री जी .डी वाळके,  उपप्राचार्य प्रा जगदिश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ अभय उत्पात, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, विभागप्रमुख प्रा धनंजय शिवपुजे, प्रा राहुल पांचाळ, प्रा अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने उपस्थित होते. प्रा.दीपक भोसले यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *