👁 8 Views

मोबाईल चोरणारी टोळी गजाआड

 

अवधुतवाडी पोलिसांनी धडक कारवाईत भ्रमणध्वनी चोरणारी टोळी गजाआड करीत त्यांच्याकडून 7 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.


मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास तक्रारदार त्याच्या मित्रासह अभ्यासिकेतून खोलीवर जात असताना तो भ्रमणध्वनी पाहात असताना त्यांच्या मागुन दुचाकीवर आलेल्या दोन इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने भ्रमणध्वनी जबरीने हीसकावला. यासंदर्भात अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.


या तक्रारीवरून पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांनी पोलिस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार व गुन्हे प्रकटीकरण पथक यांना मार्गदर्शन करून गुन्ह्यातील दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जबरीने चोरून नेलेला भ्रमणध्वनी व गुन्ह्यात वापरलेले मोबाईल जप्त करण्यात आले. तसेच त्यांना विश्वासात घेवुन त्यांच्याकडून अशाच प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी व विधी संघर्षग्रस्त बालक आणी चोरीचे मोबाईल विकत घेणारे आरोपी यांना ताब्यात घेत 4 लाख 90 हजार रुपयांचे 49 भ्रमणध्वनी, गुन्ह्यात वापरलेल्या पाच दुचाकी किंमत 2 लाख 25 हजार रु असा 7 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयुष जगताप, उपविभागीय पोलिस अधीकारी संपत भोसले, पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार, आशिष भुसारी, रुपेश धोबळे, बबलू पठाण, प्रशांत राठोड, उमेश शिंदे, रशिद शेख यांनी पार पाडली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *