👁 7 Views

भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यु, दोघे गंभीर जखमी

 

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे ते धानिवरी दरम्यान रविवारी एका कारचा भीषण अपघात झाला आहे. यात राठोड कुटुंबातील आजोबा, मुलगा व नातू अश्या तिन जणांचा मृत्यु झाला आहे.


तर 2 प्रवासी गंभीर तर इतर दोघांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवार 8 जानेवारी रोजी नालासोपारा कडून गुजरात मधील भिलाड येथे जात असताना mh. 02 dn. 6868 या कारचा ११.२५ वाजताच्या सुमारास विवळवेढे ते धानीवरी दरम्यान ओव्हरटेक करताना समोर जाणाऱ्या कंटेनर ला मागून जोरदार धडक दिल्याने कारचा भीषण अपघात झाला आहे.


यात कारचा पुढील भागाचा चक्का चुर झाला.या अपघातात नरोत्तम छना राठोड वय – ६० हे जागीच मृत्यु मुखी पडले तर केतन नरोत्तम राठोड – वय ३०आणि एक चिमुकली आरवी दिपेश राठोड वय – १ वर्ष यांचा कासा रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला .

तर वाहनं चालक दिपेश नरोत्तम राठोड वय – ३२, तेजल दिपेश राठोड – ३०, मधू नरोत्तम राठोड – ६०, स्नेहल दिपेश राठोड – वय २ वर्ष हे जखमी झाले असून त्यांच्यावर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.


महामार्ग पोलिस व कासा पोलिस घटना स्थळी पोहचून मदतकार्य करीत आहेत. काही काळ झालेली वाहतूक कोंडी सोडवून क्रेन ने अपघात ग्रस्त वाहने बाजूस घेतली. पुढील कार्यवाही कासा पोलिस करीत आहेत. चालक दिपेश राठोड याने उपचारा दरम्यान पोलिसाना ही माहिती दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *