वाद मिटवून पोलिस ठाण्यात निघालेल्या सहाय्यक फौजदाराचा कामती पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक बबलू ऊर्फ खलील अहमद सैफन नाईकवाडी (५५, रा.सिदील चौक सोलापर) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
रविवार, ८ जानेवारी रोजी दुपारी एकच्या दरम्यान कुरुल येथे किरकोळ वाद मिटवून ते कामती बुद्रुक येथील चौकात आले.
त्यांना छातीत दुखत असल्याने तेथील एका औषध दुकानातून गोळी घेतली.
त्यांनतर हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मले असा परिवार आहे.



