आटपाडी: मित्राच्या आजीच्या अस्थि विसर्जन करून परतताना अपघात, तरूणाचा मृत्यू , धडक टाळण्याच्या नादात गाडी घसरली अन्……

आटपाडी: मित्राच्या आजीच्या अस्थि विसर्जन करून परतताना अपघात, तरूणाचा मृत्यू , धडक टाळण्याच्या नादात गाडी घसरली अन्……

Loading

आटपाडी : मित्राच्या आजीच्या अस्थि पंढरपूरला विसर्जीत करून मोटारसायकलवरून परत येताना झालेल्या अपघातातील जखमींचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

धनाजी चंदकांत घाडगे (विठ्ठलनगर, आटपाडी) असे मृताचे नाव आहे.

आटपाडी पोलिस ठाण्यात त्याची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सुमित संतोष शर्मा (वय २२) आटपाडीत मजुरी करतो. त्याची आजीचे जानेवारीत निधन झाले. त्यांच्या अस्थि विसर्जनासाठी सुमित शर्मा आणि त्याचा मित्र धनाजी घाडगे २३ जानेवारीला मोटारसायकलवरून (एमएच १३, ए ए ६३८२) गेले होते.

रक्षा विसर्जन करून दोघेही पंढरपूरहून दिघंची रस्त्यावरून आटपाडीकडे परत आले. धनाजी घाडगे वाहन चालवत होता. आटपाडी आल्यावर हॉटेल माऊलीजवळ समोरून चार चाकी आली. बेसावधपणे मोटारसायकल चालवत असल्यामुळे धडक टाळण्याच्या नादात गाडी घसरून अपघात झाला. धनाजी जखमी झाला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *