👁 8 Views

ATM कार्ड बदलून लाखोंची लूट करणारे पंढरपुरात जेरबंद

 

मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या मोठ्या शहरांमध्ये  अदलाबदल करून लाखोंची लूट करणाऱ्या टोळीतल्या दोघांना पंढरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं हे दोन सराईत गुन्हेगार पंढरपूर परिसरात असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पंढरपूर शहरचे उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांच्या पथकानं पंढरपूर मोहोळ रोडवर फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्या दोन आरोपीना जेरबंद केलं.

सनी उर्फ चिकण्या मुन्ना सिंग, कल्याण आणि श्रीकांत गोडबोले (उल्हासनगर) हेच ते अट्टल चोरटे असून ATM सेंटर मध्ये बोलण्यात गुंतवून ते कार्ड बदलायचे आणि त्यातील रक्कम काढून पोबारा करायचे . ठाणे , नवी मुंबई , नाशिक , पुण्यासह अनेक ठिकाणी अशा घटना घडल्यावर ठाणे आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथक यांच्या मागावर होते. एटीएम सेंटरमध्ये बोलण्यात गुंतवून हे आरोपी कार्डसची अदलाबदल करायचे आणि मग एटीएममधून मोठी रक्कम काढून पोबारा करायचे.

ठाणे , नवी मुंबई , नाशिक , पुण्यासह अनेक ठिकाणी अशा घटना घडल्यावर ठाणे आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथक यांच्या मागावर होते . अखेर ठाणे आणि मुंबई परिसरात लूटमार करणारे हे दोन ठकसेन पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोपटासारखे बोलू लागले . त्यांनी त्यांच्याकडून विविध बँकांची तब्बल 101 एटीएम कार्ड काढून पोलिसांना दिल्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी सांगितले . दरम्यान या दोन्ही आरोपींना पंढरपूर शहर पोलिसांनी ठाणे आयुक्तालयाच्या ताब्यात दिले असून पुढील तपस ठाणे पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *