👁 7 Views

बार्शीत सेंट जोसेफस्कूलमध्ये शिक्षकाकडून एका अल्पवयीन विद्यार्थिनीस लव्हशिपसाठी तगादा

 

शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते पवित्र मानले जाते परंतु गाताचीवाडी येथील सेंट जोसेफ स्कुल मधील एका शिक्षकाने काळीमा फासण्याचे काम केले आहे . या शिक्षकाने चक्क आपल्याच अल्पवयीन विद्यार्थिनीस लवशिप करावी यासाठी वारंवार स्नपचॅट अँपवर अश्लिल मॅसेज करून व फोनवर बोलुन फोर्स केल्याचा प्रकार घडला आहे.याबाबत पिडीत मुलीने पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.


घटनेमुळे पालक वर्गात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी सेंट जोसेफ स्कुल मधील राजेश सर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .


पिडीता ही सेंट जोसेफ स्कुल मध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत आहे. तिला स्कुलमध्ये राजेश सर हे क्लास टिचर असुन ते इंग्रजी विषय शिकवतात. यामुळे पिडीता ही राजेश सर याना ओळखते. तसेच पिडीत मुलगी अल्पवयीन आहे हे राजेश सर याना माहीत होते. पिडीताने खाजगी वापरासाठी स्नॅपचॅट अॅपमध्ये अंकाऊट उघडले होते त्याचा वापर करत असताना पिडीताने स्नॅपचॅट अॅपमध्ये राजेश सर यास अॅड केले होते व तिला येणाऱ्या शैक्षणीक अडचणीबाबत राजेश सर याचेशी फोनवर बोलत होती.

मात्र याचाच फायदा उचलत राजेश सर याने पिडीतास चॅट करून मला तुझेशी फ्रँकली बोलायचे आहे असे म्हणुन लज्जास्पद असे चॅटींग करून जवळीक करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी पिडीताने घाबरून गेलेने याबाबत घरच्यांना काहीही सांगितले नव्हते.


सहली दरम्यानही पिडीतास दिला शिक्षकाने मानसिक त्रास

यादरम्यान दि. २५ डिसेबर ते दि.१ जानेवारी २०२३ रोजीचे दरम्यान #स्कुलची_ट्रिप हि कन्याकुमारी येथे गेलेली असताना राजेश सर हे पिडीतास वेळोवेळी लज्जास्पद मेसेज करत होता. परंतु राजेश सर हे टिचर असलेने त्यास पिडीताने त्यास कोणत्याही प्रकाराचा रिप्लाय न देता दुर्लक्ष करत होती. ट्रिप वरून परत आलेनंतर दि.२ जानेवारी रोजीपासुन राजेश सर हे त्याचे मोबाईल वरुन पिडीताच्या मोबाईलवर दिवसभरातुन दोन ते चार वेळा कॉल करून पिडीतासोबत अश्लील बोलुन त्याचेसोबत लव्हशिप करावी यासाठी पिडीत मुलीला फोर्स करत होते. त्यानंतर दि.८ जानेवारी रोजी दिवसभर पिडिताला ८ ते ९ वेळा मोबाइलवर कॉल करून मानसिक त्रास दिला त्यामुळे पिडीताने त्याचा कॉल उचलला नाही यामुळे सायंकाळी राजेश सर यांनी अल्पवयीन पिडीतास फोन करून धमकी दिल्याने घाबरून जावून हा प्रकार पिडीताने घरच्यांना सांगितला. याबाबत शहर पोलीसात आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *