👁 5 Views

जे करायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा- प्रा. राजेंश दंडे

पंढरपूर: प्रतिनिधी 

जीवनाच्या प्रवासात प्रत्येक जण पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे. जे आहेत त्यात बदल केला पाहिजे. आयुष्यात त्याग करता आला पाहिजे. स्वतःला कमी समजुन नका. 


ध्येय पुर्ण करण्यासाठी स्वतःचे लक्ष केंद्रित असणे आवश्यक आहे. हा करत असताना अनेक विरोधांना सामोरे जावे लागेल पण तुमच्या ध्येयावरून लक्ष बाजुला जाऊ देऊ नका. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट सांगून विद्यार्थ्यांना संबोधित केले.


   एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय कोर्टी (ता. पंढरपूर) मध्ये गुरुवार दिनांक १२ जानेवारी २०२२ रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रा. राजेश श्रीकृष्ण दंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


  या व्याख्यानाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

   महाविद्यालयाच्या वतीने व्याख्याते प्रा. राजेश श्रीकृष्ण दंडे यांचे स्वागत उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.


   या व्याख्यानासाठी महाविद्यालयातील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांना सहभागी झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर, डाॅ. श्याम कुलकर्णी, प्रा. अनिल निकम, प्रा. अभिजित सवासे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *