धक्कादायक ; सोलापूर – मंगळवेढा रोडवर कारची बाईकला मागून धडक , भीषण अपघातात तरुण जागीच ठार

धक्कादायक ; सोलापूर – मंगळवेढा रोडवर कारची बाईकला मागून धडक , भीषण अपघातात तरुण जागीच ठार
xr:d:DAF9-_OOENY:109,j:2618137370370950251,t:24022809

Loading

सोलापूर-मंगळवेढा रोडवर हिंगोली गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ एका कारने पाठीमागून मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील तरुण जागीच ठार झाला,तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.

तुषार अनिल पवार (वय-२२, रा. राजेश कोठेनगर, सोलापूर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघात इतका भीषण होता की, कारने मोटारसायकल (एमएच-१३ ईक्यू ०५६६) ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात उड्डून पडली.

कार (एम.एच-०९ जी.एम-००६४) गाडीचा वेग इतका होता की, तिचा ब्रेक न लागल्याने ती सुमारे तीनशे मीटर अंतरावर जाऊन थांबली.

अपघात घडताच या रस्त्यावरून जाणारे भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तात्यासाहेब नागटिळक हे थांबले. त्यांनी तातडीने स्थानिक पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी माहिती दिली.

पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतली. तुषार पवार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *