👁 5 Views

हुंड्याच्या लालसेपोटी पती बनला राक्षस , हातपाय बांधून ठेवले….

 

मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

खरं तर ग्वालियर जिल्ह्यातील एका महिलेने आपल्या पतीवर हातपाय बांधून अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि हुंडा म्हणून गाडी आणली नाही म्हणून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर पतीने 2 वर्षाच्या मुलीसह पत्नीलाही घराबाहेर हाकलून दिले आहे.


ही घटना ग्वालियरमधील महाराजपुरा येथील राधाकृष्ण कॉलनीमधील आहे. घरातून हाकलून दिल्यानंतर महिलेने आपले नाते वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, पती आणि सासरच्या मंडळींवर कोणताही परिणाम होत नसल्याने तिने पोलिसांत धाव घेतली. या घटनेबाबत महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.



शहरातील जुनी छावणी येथील रहिवासी असलेल्या 24 वर्षीय विवाहित महिलेने तक्रारीत म्हटले की, महाराजपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राधाकृष्ण कॉलनी येथे राहणाऱ्या तरुणाशी 2019 मध्ये तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर ती सासरी गेली असता काही महिने सर्व काही सुरळीत चालले आणि त्यानंतर तिच्या नवऱ्याने तिला तिच्या माहेरून महागडी गाडी आणायला सांगायला सुरुवात केली. त्यावर तिने आई एकटी असून शिवणकामातून खर्च चालवत असल्याचे सांगून हुंडा आणण्यास नकार दिला. यानंतर पतीने तिचा छळ सुरू केला. दरम्यान, तिने एका मुलीला जन्म दिला, परंतु त्यानंतरही तिच्या पतीच्या कृतीत कोणताही बदल झाला नाही


पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीने तिला अमानवी वागणूक दिली आणि हुंड्याची मागणी करत तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवले. हे करताना तो तिचे हातपाय बांधायचा. त्यामुळे तिला शारीरिक आणि मानसिक त्रास होत होता. तरीही आपले नाते टिकवण्यासाठी ती सर्वकाही सहन करत होती.



तसेच पतीच्या अमानवी कृत्याला विरोध करून या कृत्याची माहिती सासरच्या मंडळींना दिली असता सासरच्यांनी पीडितेला घराबाहेर काढले. घरातून हाकलून दिल्यानंतर महिलेने नाते वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण काही जमले नाही मग तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *