👁 4 Views

सापाला माकडाने बडवलं , फणा मारायला गेल्यावर तोंडावर मारली चापट

 

सोशल मीडियावर प्राण्यांचे रोज नवे व्हिडीओ पाहायला मिळतात, त्यापैकी काही व्हिडीओ लोकांना पाहायला अधिक आवडतात.


असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका माकडाने सापाला चांगलच बडवलं असल्याचं तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळेल. 


अनेकदा सापाला पाहिल्यावर अनेकांना घाम फुटतो. त्याचबरोबर सापाचे आणि अन्य प्राण्यांचे भांडण आपण व्हिडीओच्या माध्यमातून पाहिले आहे. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला पाहिल्यानंतर अनेक लोकांनी कमेंट आणि लाईक सुध्दा केले आहे.

दोन साप एका ठिकाणी आहेत, त्याचवेळी तिथं एक साखळीने बांधलेलं माकडं आहे. हे माकडं दोन नागाच्या समोर अचानक उडी घेतं. त्यानंतर समोर असलेल्या सापाला चापट मारतो. 


माकडं वारंवार मारत असल्याचं लक्षात आल्यानंतर साप फणा काढतो आणि फणा मारण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी माकडं पुन्हा त्याला पकडून ठेवतं. त्यानंतर दुसरा साप माकडाला फणा मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार माकडाने दोन्ही सापांची चांगलीचं धुलाई केली आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. लोकांनी व्हिडीओच्या खाली अनेक कमेंट केल्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *