“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात‎ साजरा”

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात‎ साजरा”

Loading

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे नर्सरी ते दहावी‎ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात‎ साजरा करण्यात आला. सुमारे 1400 विद्यार्थ्यांनी एकत्र‎ येऊन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.‎ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा .सौ सीमाताई परिचारक, तुकाराम आप्पा राऊत , मा. सुभाष माने जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.‎

या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने उद्घाटन‎ करण्यात आले. प्राचार्या सौ.प्रियदर्शनी सरदेसाई यांनी पालक‎ व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शब्दात संबोधित केले.‎ कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदना‎ सादर केली. वार्षिक स्नेहसंमेलनाचा उत्सव दोन दिवस‎ चालला.


कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि‎ आनंदाचे वातावरण होते आणि शिक्षकांनी घेतलेल्या‎ मेहनतीचे प्रदर्शन या भव्य सोहळ्यातून दिसून आले.‎ दुसऱ्या दिवसाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. एका‎ भारतामध्ये अनेक स्वप्नांच्या अभिसरणाची थीम ‘अतुल्य भारत’ या आधारे सादर करण्यात आली.‎ यावेळी मुलांनी संपूर्ण भारताचे दर्शन घडवणारे अतुल्य भारत ही मध्यवर्ती कल्पना नजरे समोर ठेऊन अफलातून नृत्य सादर केले. नृत्य हे कार्यक्रम शाळेने आयोजित केले होते.‎ कार्यक्रमांचे संचालन विद्यार्थ्यांनी केले.

वार्षिक दिनाच्या‎ समारंभाचा समारोप श्री. राजेंद्र जाधव यांच्या आभार प्रदर्शनाने‎ झाला, ज्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि सहाय्यक‎ कर्मचार्यांरच्या प्रयत्नांची कबुली दिली आणि आदरणीय‎ पाहुण्यांचे अमूल्य वेळ आणि उपस्थितीबद्दल आभार‎ मानले.‎

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *