शिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी येथे ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ!

शिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी येथे ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ!

Loading

पंढरपुरातील श्रीविठ्ठल मंदिराच्या महाद्वारातील संत नामदेव पायरी येथे सामुदायिक आरती करण्यात आली.

पंढरपूर – मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या मागणीसाठी दर आठवड्याला ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता. त्याप्रमाणे या अनुषंगाने ३१ डिसेंबर २०२४ या दिवशी पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी या ठिकाणी ‘सामूहिक आरती’ मोठ्या उत्साहाने आणि भावपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली, अशी माहिती ‘मंदिर महासंघा’चे सदस्य श्री. विनोद रसाळ यांनी दिली आहे.


या वेळी पंढरपूर येथील वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर आणि राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, तसेच ह.भ.प. शाम महाराज उखळीकर, ह.भ.प. चवरे महाराज, ह.भ.प. रघु महाराज कबीर, ह.भ.प. नागेश महाराज बागडे, ह.भ.प. दर्शन महाराज बडवे, ह.भ.प. बाबाराव बडवे महाराज, महेश खिस्ते, सौरभ थिटे, वैभव बडवे, बाळासाहेब डिंगरे, महेशाचार्य उत्पात, विठ्ठल बडवे, हरी काका कुलकर्णी, रवी काका क्षीरसागर, श्रीराम बडवे, सचिन लादे, इस्कॉनचे नागेश दास, दिलीप बडवे, मयूर बडवे, उदय इंदापूरकर, अधिवक्ता आशुतोष बडवे, रामेश्वर कोरे, महाराष्ट्र मंदिर महासंघ राज्य कोर ग्रुप सदस्य श्री. गणेश लंके, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. विनोद रसाळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांच्यासह मोठ्या संख्येने विविध मंदिरांचे विश्वस्त, वारकरी मंडळी आणि भाविक उपस्थित होते.


२४ आणि २५ डिसेंबर २०२४ ला श्री साई पालखी निवारा, निमगांव, शिर्डी येथे झालेल्या तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त महाराष्ट्रभरातून ८७५ हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते तथा मंदिर अभ्यासक सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने मंदिरे, तसेच मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात दर आठवड्यातून एकदा ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करणे, काशी आणि मथुरा तीर्थत्रक्षेत्रांचा खटला जदलगती न्यायालयात चालवावा; सरकारने राज्यातील सर्व मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करावीत; मंदिरात भक्तांनी अर्पण केलेला निधी महाराष्ट्र सरकारने विकासकामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी; मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ होण्यासाठी सरकारने अधिसूचना काढावी; राज्यातील मंदिरांच्या पुजार्‍यांना प्रतिमाह मानधन देण्याचा निर्णय घ्यावा आदी प्रमुख मागण्या ठरावांद्वारे सरकारकडे करण्यात आल्या होत्या.

या मागण्या सरकारने तात्काळ पूर्ण करव्यात, अशी मागणी मंदिर महासंघाचे श्री. विनोद रसाळ आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *